Written by 7:45 pm Featured

या चांगल्या सवयीने आरोग्य लाभेल

Good habits for health in marathi
१. सकाळी लवकर उठावे. त्यामुळे दिवसाची सुरुवात आनंदी व उत्साही होते.
२. नियमित व्यायाम करावा. व्यायामामुळे शरीरातील थकवा नाहीसा होतो.
३. पाणी हे आपल्याला निरोगी राहण्यासाठी मदत करते. त्यामुळे दिवसभरात कमीत चार ते पाच लिटर पाणी शरीरास आवश्यक असते.
४. आपला आहार हा संतुलित असला पाहिजे. संतुलित आहारामुळे आजारपण येत नाही. मानसिक स्वास्थ चांगले राहते.
५. वैयक्तिक स्वच्छता पाळा. कुठलेही अन्नपदार्थ खाण्याआधी हात स्वच्छ धुवावेत, स्वच्छ पाणी प्यावे, घर स्वच्छ ठेवावे.
६. शारीरिक आरोग्य राखण्यात मौखिक आरोग्य महत्वाचे असते. नियमित ब्रुश, दातांची तपासणी ह्याची काळजी घ्यावी.
७. काही ठराविक वेळेनंतर शारीरिक तपासणी करून घ्यावी. कारण उच्च रक्तदाब, मधुमेह ह्या रोगांना सायलेंट किल्लर म्हटले जाते. त्यामुळे काही रोगांना उपचार वेळीच आवश्यक असतात.
८. नेहमी सकारात्मक विचार करावा त्यामुळे आयुष्य निरोगी राहण्यास मदत होते.
९. अल्ट्रा व्हायोलेट किरणांपासून त्वचेचे संरक्षण करावे त्यामुळे त्वचा रोगांपासून दूर राहण्यास मदत होते.
१०. आजारपणात नेहमी द्रव्य पदार्थ सेवन करावेत ज्यामुळे शरीरातील विषद्रव्य बाहेर पडण्यास मदत होते.
. रोजच्या धावपळीतून विश्रांतीसाठी वेळ काढा आणि कुटुंबाच्या आनंदासाठी वेळ द्या. 
For Useful Educational Videos to improve Spoken English and Grammar, please visit and Subscribe our You Tube Channel

👇

 Please Click On Below Image To Subscribe Our Channel

(Visited 198 times, 1 visits today)
Close