Written by 3:45 pm Featured

Polytechnic Admissions – 2021 Details

सौजन्य - तंत्रशिक्षण संचलनालय

Polytechnic Admission – (पॉलिटेक्निक प्रवेशासंदर्भात)

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता महाराष्ट्र
पॉलिटेक्निक (Polytechnic) प्रवेशासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून राबविण्यातत येणाऱ्या तीन वर्ष कालावधीच्या पूर्ण वेळ अभ्यासक्रमासाठीच्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेस खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आली आहे.
१. प्रवेशासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन नोंदणी व् कागदपत्रांच्या स्कॅॅन छाया प्रति अपलोड करने यासाठी पहिली तारीख ३०.०६.२०२१ ही देण्यात आली होती परन्तु त्यात बदल करून ३०.०७.२०२१ हि नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे.
२. प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी व अर्ज भरल्याची निश्चिती (Document Verification and Confirmation for Form Submission) या करता ३०.०६.२०२१ ही तारीख देण्यात आली होती परन्तु त्यात बदल करून ३०.०७.२०२१ हि नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे.
३. महाराष्ट्र राज्य / अखिल भारतीय / जम्मू – काश्मीर व लद्दाख विस्थापित उमेदवारांसाठी संकेतस्थळावर तात्पुरत्या गुणवत्ता याद्या ०२.०८.२०२१ या तारखेस प्रदर्शित करण्यात येतील.
४. सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी तात्पुरत्या गुणवत्ता याद्यामध्ये तक्रार असल्यास त्या  सादर करणे यासाठी पहिली तारीख  ०३.०८.२०२१ ही देण्यात आली होती परन्तु त्यात बदल करून ०५.०८.२०२१ हि नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे.
५. महाराष्ट्र राज्य / अखिल भारतीय / जम्मू – काश्मीर व लद्दाख विस्थापित उमेदवारांसाठी संकेतस्थळावर अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करण्यासाठी ०७.०८.२०२१ हि तारीख जाहीर करण्यात आली आहे.
Polytechnic Admissions - 2021 Details
(Visited 114 times, 1 visits today)
Close