Written by 7:29 am चला इंग्रजी शिकूया (मराठीतून)

प्रेरणादायक कथा – इतरांचा आदर, प्रशंसा करणे एक चंगली सवय

इतरांचा आदर, प्रशंसा करणे एक चांगली सवय

आपल्या आयुष्यात खूप लोक येतात. त्यांचे आपल्या आयुष्याच्या जडण – घडणीत खूप योगदान ठरते. आपण इतरांना दिलेली दाद, प्रशंसा किती लोकांचे आयुष्य बदलते, हि अशीच एक प्रेरणा देणारी कथा आहे.

एका गावामध्ये जॉन नावाचा अतिशय मेहनती व शिस्तप्रिय कामगार होता. तो एका कंपनीमध्ये कामाला जायचा. तेथे तो सर्वांशी अतिशय प्रेमाने व मायेने वागायचा. मोठ्यांपासून ते  लहानांपर्यंत तो सर्वांचा आदर करायचा. दररोज तो इतरांना शुभेच्छ्या द्यायचा. एके दिवशी कामात मग्न असतांना त्याची जाण्याची वेळ निघून गेली ते त्याला कळलेच नाही. म्हणजेच कंपनी सकाळी १०.०० वाजता उघडायची आणि सायंकाळी ६.०० वाजता बंद व्हायची. पण जॉनला कामामुळे लक्षातच राहिले नाही. ठीक ८.०० वाजले आणि अचानक तो वॉचमन आत आला आणि त्याने जॉनला आठवण करून दिली कि, ‘साहाब, आपको बहुत दर हुई है’, आज जॉनला कळलेच नाही कि, असे कसे याला समजले कि मी आत आहे. त्याने त्याला प्रश्नहि केला. तो वॉचमन म्हणाला, ‘सर आपही तो हो जो भुलकर भी मुझे ‘Good Morning’ और  ‘Good Night’ कहे बिना नही जाते. और आज मैने वही ‘Good Night’ मिस किया, इसलिये मुझे लगा कि आप अंदर हि है |’
तात्पर्य : जीवनामध्ये आपण इतरांचा आदर अथवा सन्मान केल्यास त्याची फलश्रुती आपणास नक्कीच मिळते.
(Visited 560 times, 1 visits today)
Close