Written by 11:48 pm Std.12 English

Std.12 | Hall Ticket 2022 | इ.१२ वी परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्द शिक्षण मंडळाची महत्त्वाची घोषणा

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी आणि तोंडी परीक्षा लवकरच सुरु होत आहे. इयत्ता १२ वी बोर्डाची प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Exam) १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ तर लेखी परीक्षा HSC Written Exam ४ मार्च ते ३० मार्च २०२२ या कालावधीत घेतली जाणार आहे.  

इयत्ता १० वी बोर्डाची प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Exam) २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ या कालावधीत तर लेखी परीक्षा SSC Written Exam १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या दरम्यान होणार आहे.

इयत्ता १२ वी परीक्षेचे हॉल तिकीट प्रसिद्ध झाले आहे का?  | Is Maharashtra HSC Hall Ticket 2022 Released?

HSC Hall Ticket 2022 download pdf maharashtra

होय, मार्च-एप्रिल २०२२ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ.१२ वी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत (Hall Ticket) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने HSC Hall Ticket 2022 Released केले आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ साठी सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना मार्च-एप्रिल २०२२ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर बुधवार, दिनांक ०९/०२/२०२२ रोजी दुपारी १.०० वाजल्यापासून college login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होणार आहे.

ऑनलाईन प्रवेशपत्रे (Hall Ticket) उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने सूचित करण्यात आले आहे  की,  मार्च-एप्रिल २०२२ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी इ.१२ वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे (HSC Hall Ticket 2022 download pdf) प्रिंट करून त्यावर मुख्याध्यापकांचा/प्राचार्याचा शिक्का मारून स्वाक्षरी करून, विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.

(Visited 1,989 times, 1 visits today)
Close