Written by 10:54 pm Featured

ह्या आठ स्वभावाच्या सवयी तुमच्या व्यक्तिमत्वास घातक

चांगले व्यक्तिमत्व म्हणजेच चांगला प्रभाव. चांगले व्यक्तिमत्व घडविण्यासाठी चांगल्या सवयी आवश्यक असतात. परंतु काही सवयी ह्या आपल्या व्यक्तिमत्वास हानी पोहोचवितात त्याबद्दल हि सविस्तर चर्चा.

असे म्हणतात की,
आपली ओळख आपल्या वर्तनावरून व देहबोलीवरून होते.
आपली देहबोली (Body Language) हि आपली पहिली ओळख असते.
आपली देहबोली, कपडे, बोलणे, चालणे, वागणे ८०% आपल्या स्वभाव व चारित्र्य दर्शवितात.
थोडक्यात
Body Language is the mirror of our personality.
येथे आपण त्या ८ सवयी किंवा हावभाव (Gesture) बदल चर्चा करणार आहोत जे आपल्या व्यक्तिमत्वाला अपायकारक असतील.

१. बोलताना किंवा ऐकताना खाली पाहणे.

हि एक वाईट सवय आहे. कोणी बोलताना आपण त्याच्या चेहऱ्याकडे न पाहता खाली किंवा इतरत्र पाहत आसतो, त्यावेळेस तुम्हाला बोलणारा तुमच्याबद्दल नकारार्थी विचार करतो.
त्याशिवाय तुमच्याबद्दल तो आस्था ठेवणार नाही कारण तुम्ही त्याचा आदर करत नाही असे तो गैरसमज करू शकतो. आपण बोलतानाही समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे विशेषतः डोळ्याकडे पाहून बोलावे जेणेकरून चांगला संवाद निर्माण होईल.

२. बोलताना चेहऱ्यावर हात फिरवणे.

संभाषणात हि एक वाईट सवय समजली जाते, बोलताना जेव्हा आपण आपल्या चेहऱ्यावर हात फिरवतो त्यावेळेस आपण गोंधळलेलो आहोत किंवा आपला आत्मविश्वास कमी आहे किंवा आपण दुसऱ्या विचारात आहोत असे समोरच्या व्यक्तीस वाटते व तो आपल्या संभाषणात रस येणार नाही. हि एक प्रकारची वाईट प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावर पडेल.

३. बोलताना किंवा ऐकताना पाय हलविणे.

काही लोक बोलताना किंवा ऐकताना पाय हलवितात. उभे राहिलेल्या स्थितीत किंवा खुर्चीवर बसलेल्या अवस्थेत निश्चितच हि वाईट सवय आहे. आपण बोलताना जेव्हा पाय हलवितो, तेव्हा आपण आपल्या अस्थिर स्वभावाची ओळख दर्शवितो. ऐकताना जेव्हा आपण पाय हलवितो, तेव्हा समोरची व्यक्ती आपल्याशी बोलण्यात रस घेणार नाही हे नक्की.

४. बोलताना बोटे खाजाविणे किंवा घासणे.

बरेच लोकांना हि सवय असते. एखादी व्यक्ती बोलत असताना जेव्हा आपण बोटे चोळतो किंवा खाजवितो, तेव्हा आपल्या कमी आत्मविश्वासाची ती प्रचिती देतात. खाज आल्यावर खाजाविणे हे समजण्यासारखे आहे. परंतु ती सवय करून घेणे निश्चितच वाईट आहे. ह्या बाबी आपल्या व्यक्तिमत्वावर वाईट प्रभाव टाकतात.

५. बोट दाखवीत बोलणे.

हि एक वाईट सवय समजली जाते. बरेच लोक बोलताना बोट दाखवित बोलतात त्यामुळे ऐकणारा व्यक्ती स्वतःला दबावाखाली समजतो किंवा बोलणारा व्यक्ती काहीतरी अधिकार गाजवीत आहे, असा समज होतो.

६. हात मागे करून उभे राहणे.

जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत असते व आपण जेव्हा हात मागे करून ऐटीत उभा राहतो तेव्हा बोलणाऱ्या व्यक्तीला आपण आपल्या उर्मट स्वभावाची ओळख करून देतो जे योग्य नाही.

७. पायाला घडी करून बोलणे किंवा ऐकणे.

हि एक संभाषणात अतिशय वाईट सवय आहे. उभेअसताना,जेव्हा आपण पायाला घडी करून बोलतो, आपण काहीतरी अधिकार गाजवत आहोत असा होतो. ऐकताना जेव्हा आपण या स्थितीत असतो, तेव्हा बोलणाऱ्याकडे दुर्लक्ष करत आहोत असा समाज होतो.

८. स्मित हास्य किंवा प्रसन्नता चेहऱ्यावर नसणे.

संभाषणात स्मित हास्य किंवा प्रसन्नता नसणे हि कमी आत्मविश्वासाची ओळख आहे. बोलताना किंवा ऐकताना चेहऱ्यावर स्मित हास्य किंवा प्रसन्नता असणे आवश्यक असते. त्यामुळे वातावरण comfortable होते व ताण तणाव दूर होण्यास मदत होतो कारण हास्य हे सर्वोत्तम सौंदर्य प्रसाधन असते.

For Useful Educational Videos to improve Spoken English and Grammar, please visit and Subscribe our You Tube Channel

Please Click On Below Image To Subscribe Our Channel

(Visited 201 times, 1 visits today)
Close