Written by 7:24 am चला इंग्रजी शिकूया (मराठीतून)

प्रेरणादायक कथा – इतरांना दोष देणे सोपे

इतरांना दोष देणे सोपे

एकदा एक कलाकार जो कि, अत्यंत सुरेख चित्रे काढायचा. असेच एक सुंदर चित्र काढून त्याने ते चित्र शहराच्या मध्यभागी असलेल्या चौकात उभे केले आणि त्याखाली असे नमूद केले कि, यात ज्या काही चुका वाटतील त्या तुम्ही बाजूला लिहून ठेवा. त्याला वाटले कि त्याने काढलेले चित्र अतिशय दुर्मिळ व सुरेख आहे. पण त्याला याची कल्पनाहि नव्हती. जे त्याने दुसऱ्या दिवशी पाहिले, तर काय त्याचित्राभोवती असंख्य अश्या चुका लोकांनी नमूद केल्या होत्या.

हे पाहताच त्याला खूप वाईट वाटले. त्याने असे का झाले याची शहानिशा करण्यासाठी तो आपल्या गुरु कडे गेला. त्याने सर्व हकीकत सांगितली. त्यावर गुरूने एक उपाय सुचविला. ते म्हणाले कि तू परत एक चित्र काढ आणि तसेच ते तेथे ठेव. पण यावेळी त्या चित्राबरोबरच एक रिकामी जागा ठेव. त्यात असे स्पष्ट लिही कि, यात ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी दुरुस्त करून चूक नमूद करा. त्याने असेच केले व ते चित्र तेथे नेऊन ठेवले.

दुसऱ्या दिवशी पाहतो तर काय? त्या चित्रात एक हि त्रुटी अथवा चूक काढण्यात आलेली नव्हती.

बोध : इतरांना कमी लेखने, त्यांच्या चुका काढणे अगदी सोपे आहे. त्याउलट आत्मपरीक्षण करणे तेवढेच अवघड.
(Visited 289 times, 1 visits today)
Close