Written by 1:27 pm Spoken English, चला इंग्रजी शिकूया (मराठीतून)

इंग्रजी बोलण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Here are some important tips to improve English in Marathi

english-speaking-tips

प्रत्येकाला आपले व्यक्तिमत्व प्रभावी असावे असे वाटते. ही सर्वांची महत्त्वाकांक्षा आहे. काही वर्षांपूर्वी व्यक्तिमत्व म्हणजे वर्ण, देहबोली, बोलणे, चालणे, ऊंची कपडे इत्यादी बाबींचा समावेश होत असे, परंतु या आधुनिक काळात व्यक्तिमत्वाची संकल्पना बदललेली पाहावयास मिळते.

आज व्यक्तिमत्व म्हणजे पेहराव, बोलणे, देहबोली व त्यात भर म्हणजेच इंग्रजी बोलण्याची पद्धत. आज एखादी व्यक्ति जेव्हा इंग्रजी बोलते त्याचा अर्थातच अधिक प्रभाव पडतो. इंग्रजी बोलता येते हा एक व्यक्तिमत्वाचा अविभाज्य घटक झाला आहे. आज भारतात इंग्रजी नंबर 2 जी बोली भाषा आहे. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यन्त ही भाषा संवादाची व दळणवळनाची भाषा झाली आहे. प्रत्येकाला इंग्रजी बोलण्याची इच्छा असते, परंतु त्यातून अनेकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषत: काही अडचणी आपण स्वत: निर्माण करतो. उदा. इंग्रजी बोलतांना संकोच वाटणे, बोलतांना कोणी हसेल अशी निरर्थक भावना मनात निर्माण होते.

English With PK99 च्या ह्या ब्लॉग मध्ये आपण इंग्रजी बोलण्याचे तंत्र व त्यासाठी काही महत्वाच्या बाबींवर चर्चा करणार आहोत. आम्हास खात्री आहे की हा ब्लॉग वाचल्यानंतर आपणास इंग्रजी बद्दलचे गैरसमज दूर होऊन इंग्रजी शिकण्याची आणि आत्मविश्वासाणे बोलण्याची तीव्र इच्छाशक्ति निर्माण होईल.

नियम पहिला : इच्छाशक्ति
इंग्रजी बोलणे शिकण्यासाठी सर्वप्रथम इच्छाशक्तिची गरज आहे. केवळ इतर बोलतात म्हणून इंग्रजी शिकू नये. स्वत:ची ही तयारी असणे हे फार आवश्यक व महत्ववाची बाब आहे. कारण त्याचा फायदा सर्वस्वी तुम्हालाच मिळणार आहे.

नियम दूसरा : संकोच न वाटणे
हा महत्वाचा नियम आहे. तुम्ही कसेही असाल, तुमच्याकडून सुरवातीला चुका होऊ शकतात. जगातील सर्व कला शिकतांना सुरवातीला चुका होऊनच अनेकजण त्यात पारंगत झाले आहेत. त्यामुळे बोलतांना चुकेल म्हणून संकोच करू नका. सतत बोलत राहा. काही दिवसातंच तुम्ही इंग्रजी बोलण्यावर प्रभुत्व मिळवाल यात शंकाच नाही.

नियम तिसरा : जास्त इंग्रजी ऐका
हे खरे आहे, जितके तुम्ही इंग्रजी ऐकाल तेवढे इंग्रजी बोलाल. साधा नियम आहे की, If input is strong in communication, output will be strong. यासाठी तुम्हाला इंग्रजी बोलणार्‍या व्यक्तींसोबत बोलण्याची तयारी ठेवावी लागेल. त्यात तुम्ही टीव्हीवरील इंग्रजी बातम्या ऐकु शकता किंवा YouTube वरील इंग्रजी संभाषण/विडियो पाहू शकता.

नियम चौथा : बोलतांना संकोच न बाळगणे
हा सर्वात मोठा नियम आहे. कोणीतरी आपल्याला हसेल म्हणून बरेच लोक इंग्रजी बोलण्यापासून दूरच राहतात आणि इथेच चुकतात. ज्यांना सध्या इंग्रजी बोलता येते तेही या प्रसंगातून गेलेले असतात. त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत इंग्रजी बोलतांना कोणीतरी आपल्यावर हसेल याची पर्वा करू नका व इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करा.

नियम पाचवा : दररोज 10 इंग्रजी शब्द शिका
हा सुद्धा एक महत्वाचा नियम आहे. जर तुम्हाला इंग्रजी शब्द माहीत नसतील तर तुम्ही वाक्य बनवू शकणार नाहीत. कारण तुम्हाला शब्द माहिती नसल्यामुळे आत्मविश्वास येणार नाही. त्यामुळे त्यासाठी दररोज व्यवहारातील नवीन 10 शब्द शिकणे आवश्यक आहे. More Words, More English, More Command!

नियम सहावा : टीव्ही, YouTube चा प्रभावी वापर
इंग्रजी सबटाइटल्स असलेली चित्रपटे, धारावाहिक पाहणे हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. आजकाल तुम्ही टीव्ही किंवा YouTube वरील असे चित्रपट किंवा धारावाहिक पहिल्याने तुमची इंग्रजीवर पकड मजबूत होण्यास मदत होईल आणि त्यामुळे तुमचा शब्दसाठाही वाढेल.

नियम सातवा : मोठयाने बोला
म्हणजे तुम्ही एकटे असतांना, जेव्हा तुम्ही मोठयाने बोलता, अर्थातच तुमचे उच्चार तुम्हाला इंग्रजी सुधारण्यासाठी प्रेरित करतील. याशिवाय सर्वात प्रभावी म्हणजे तुम्ही बोललेले मोबाइलवर रेकॉर्ड करा व ते नंतर ऐकून आपले शब्दांचे उच्चार, आवाजातील चढ-उतार यांचा अभ्यास करून त्यांना सुधारा.

नियम आठवा : संयम बाळगा
इंग्रजी बोलणे ही एक कला आहे आणि कोणालाही कला शिकण्यासाठी सरावाची आवश्यकता असते हे पूर्णत: लक्षात ठेवा. परिपूर्ण इंग्रजी बोलण्यासाठी तुम्ही केलेल्या सरावानंतर सात ते बारा महिन्यांचा कालावधी लागू शकतो त्यामुळे संयम बाळगणे आवश्यक आहे.

नियम नववा : महत्वाची चार Topics
Tense, Prepositions, Articles, Models हे इंग्रजी भाषेचे आणि इंग्रजी बोलण्यासाठीचे आवश्यक topics आहेत.

  • Tense मुळे इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास वाढतो.
  • Prepositions मुळे लहान-सहान चुका टाळता येतात.
  • Articles मुळे वाक्यरचना सोपी होते.
  • Models मुळे कोठे कसे बोलावे हे कळते.

 

नियम दहावा : उच्चारचा सराव करावा
उच्चार हा इंग्रजीचा आत्मा आहे, योग्य उच्चार म्हणजे योग्य इंग्रजी. त्यामुळे टीव्ही, YouTube किंवा मोबाइलवरील इंग्रजी संभाषण ऐकणे आवश्यक आहे.


परिपूर्ण इंग्रजी शिकण्यासाठी English With PK99 Blog आणि आमच्या YouTube Channel ला नियमित भेट द्या.

(Visited 2,031 times, 1 visits today)
Close