Written by 4:22 pm Featured

Maharashtra Board Exam 2022

Maharashtra Board Exam 2022

सौजन्य : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ

*लेखी परीक्षा (प्रत्यक्ष केंद्रावर)*
*बारावी – 4 मार्च 2022 ते 7 एप्रिल 2022 *
*दहावी- 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 *
*HSC (उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र)* आणि SSC (*माध्यमिक शाळा प्रमाणपत्र)* बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. सर्व संबंधित घटकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर वेळापत्रक तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. चार मार्च 2022 ते सात एप्रिल 2022 या दरम्यान बारावीची लेखी परीक्षा होणार आहे. तर 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 यादरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे. दोन्ही परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावरच म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. कोरोना महामारीमुळे 25 टक्केंचा अभ्यास याआधीच कपात करण्यात आला आहे. उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील, असे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

प्रात्यक्षिक,श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांची परीक्षा बारावी,दहावीसाठी अनुक्रमे 14 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022 आणि 25 फेब्रुवारी ते 14 मार्च 2022 याकालावधीत पार पडेल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळ परीक्षांचे तपशीलवार वेळापत्रक जाहीर करेल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. दहावी,बारावीच्या आऊट ऑफ टर्न परीक्षार्थींसाठी प्रात्यक्षिक,श्रेणी व तोंडी,अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तसेच बारावीसाठी माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान ऑनलाईन परीक्षा आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाच्या (10वी) परीक्षा खालीलप्रमाणे राहील .
For Useful Educational Videos to improve Spoken English and Grammar, please visit and Subscribe our You Tube Channel

👇

 Please Click On Below Image To Subscribe Our Channel

(Visited 315 times, 1 visits today)
Close