Written by 5:00 pm चला इंग्रजी शिकूया (मराठीतून)

चला इंग्रजी शिकूया – दिवस ३ रा

Spoken English Day - 3

नियम १ –   Has, have, had हि क्रियापदे मालकी दर्शवतीत. त्यापैकी has, have वर्तमानकाळात
                     वापरतात तर had भूतकाळासाठी वापरतात.

नियम २ –   Has हे एकवचनीसाठी वापरावे. याचा अर्थ ‘आहे’ असा होतो.
                     उदा. त्याच्याकडे कार आहे.(He has a car.)

नियम ३ –   Have हे अनेकवचनी नामासाठी वापरावे. (अपवाद फक्त i आणि you) have चा अर्थ
                   त्यांच्याकडे आहे असा होतो.

नियम ४ –   Had चा अर्थ ‘त्यांच्याकडे होते’ असा होतो व ते भूतकाळासाठी वापरावे.
                  Had हे एकवचनासाठी व अनेकवचनासाठी वापरावे.

I have – माझ्याकडे आहे.

English

मराठी

1. I have a car.
2. I have good friends.
3. I have good books.
4. I have some doubts.
5. I have many dresses.
१. माझ्याकडे कार आहे.
२. माझ्याकडे चांगले मित्र आहेत.
३. माझ्याकडे चांगली पुस्तके आहेत.
४. माझ्या काही शंका आहेत.
५. माझ्याकडे बरेच कपडे आहेत.
He / She / The boy has
त्याच्याकडे आहे.
1. He has a car.
2. She has many friends.
3. He has many books.
4. My father has a good job.
5. She has a sensible friend.
१. त्याच्याकडे कार आहे.
२. तिच्या बऱ्याच मैत्रिणी आहेत.
३. त्याच्याकडे बरीच पुस्तके आहेत.
४. माझ्या वडिलांकडे चांगली नोकरी आहे.
५. तिच्याकडे समजदार मैत्रीण आहे.
I had / He had
1. I had good friends.
2. He had a good job.
3. I had many books.
4. She had my mobile number.
5. They had a good job.
माझ्याजवळ होते.
१. माझ्याकडे चांगले मित्र होते.
२. त्याला चांगली नोकरी होती.
३. माझ्याकडे बरीच पुस्तके होती.
४. तिच्याकडे माझा मोबाइल नंबर होता.
५. त्यांच्याकडे चांगली नोकरी होती.
(Visited 364 times, 1 visits today)
Close