Written by 8:39 pm Featured

ISRO : FREE ONLINE CERTIFICATE COURSE 2021

फक्त ४ दिवस बाकी…!!!
इस्रो online कोर्सची लिंक या ठिकाणी दि. २६ जुलै ते ३० जुलै २०२१ या कालावधीत सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या कालावधीत इथे उपलब्ध होईल.
म्हणून हे PAGE bookmark करून ठेवा

अंतराळसंशोधन करणा-या जगातील अग्रगण्य संशोधन संस्थांपैकी एक भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO). इस्त्रो मार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला वाव देऊन त्यांना अंतराळातील अंतरंगाची सखोल ओळख व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

यासाठी इस्त्रो मार्फत Free Online Course करिता अर्ज मागविण्यात आले होते. इस्त्रोचे केंद्र असलेल्या इंडियन इंस्टीट्यूट ऑफ रिमोट सेंसिंग (IIRS) मार्फत ‘रिमोट सेंसिंग तंत्रज्ञानाचे महत्व व पर्यावरण अभ्यासासाठी भौगोलिक माहिती प्रणाली (GIS)’ या नावाने मोफत ५ दिवसांच्या Free Online Course चे आयोजन करण्यात येणार आहे. अंतरीक्ष, पृथ्वी व पर्यावरण या तिन्ही घटकांमध्ये तंत्रज्ञानाचे महत्व किती अनन्यसाधारण आहे ही वस्तुस्थिती विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे हा या कोर्समागचा मुख्य उद्देश आहे. उपग्रह प्रणाली व इमेज प्रोसेसिंग याबद्दल अतिशय अभ्यासपूर्ण व प्रात्यक्षिक माहिती मिळविण्याची संधी यानिमित्ताने विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे.
 
कोर्सेबद्दल:

१. हा कोर्स इयत्ता १०वी, ११वी आणि १२वी या वर्गांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी मोफत आहे.
२. २६ जुलै २०२१  ते ३० जुलै २०२१ या दरम्यान Online कोर्सचे आयोजन केले जाणार आहे.

३. IIRS च्या YouTube  Channel वर या कोर्सचे Live क्लासेस होतील.
४. दररोज ४५ मिनिटांचे सकाळी १०.०० व दुपारी १२.०० या वेळेत दोन क्लासेस होतील.
५. विद्यार्थी आपले प्रश्न Chat Box मधून विचारू शकतात व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे कार्यक्रमादरम्यान दिली जातील.
६. कार्यक्रमादरम्यान दररोज एक QUIZ (प्रश्नमंजूषा) दिली जाईल.
७. काही कारणास्तव विद्यार्थ्यांना Live क्लास करता आला नाही तर असे विद्यार्थी दुपारी ३.०० वाजता कार्यक्रमाची रेकॉर्डिंग पाहू शकतात.
 
अर्ज कसा करावा?

१. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत आदेश व माहितीपत्रक व्यवस्थित वाचावे.
२. एका वेळी एकाच विद्यार्थ्याने अर्ज करावा .
३. JPG  तथा PNG स्वरुपात आपला फोटो अपलोड करावा.
४. अर्ज सदर झाल्यावर लगेच आपल्या इमेलवर LOGIN माहिती मिळेल. यावरून आपणास LMS Portal वर लॉगिन करता येईल.
५. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०२१ आहे.
६. पाच दिवसांचा हा ISRO Free Online Course पूर्ण केल्यानंतर आपणास त्याचा थोडक्यात अहवाल/अभिप्राय (FEEDBACK)  द्यायचा आहे.
७. ५ ऑगस्ट २०२१ पर्यंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र त्यांच्या इमेलवर देण्यात येईल.
ऑनलाईन कोर्सची YOUTUBE लिंक २६ जुलै २०२१  ते ३० जुलै २०२१ या दरम्यान इथेच दिली जाईल. तेव्हा हे PAGE bookmark करून ठेवा.

अधिकृत आदेश

माहितीपत्रक

(Visited 491 times, 1 visits today)
Close