SSC Board Exam
बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील महिन्यात पार पडणार आहेत. वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होत आहे.
तर त्यानंतर दहावीची परीक्षा (SSC Board Exam) 15 मार्चपासून पार पडणार आहे. दरम्यान दहावी परीक्षेसाठी हॉल तिकीट 18 फेब्रुवारीला दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. हॉल तिकीट बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध केले जाणार आहे.
————————————————————————————————–
दहावी बोर्डाचे ऑनलाइन हॉल तिकीट
www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे. दरम्यान ऑनलाइन हॉल तिकीट शाळेकडून प्रिंट करून आणि मुख्याध्यापकांची सही, शिक्का मारून विद्यार्थ्यांना वितरित केले जाणार आहे. हॉलतिकीट मिळवताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधायचा असल्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्याकडून त्यासाठी कोणतेही शुल्क न घेता सदर हॉल तिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी अशा सूचनाही शाळांना देण्यात आल्या आहेत.
————————————————————————————————–
कसं कराल डाऊनलोड?
सर्वात आधी तुम्ही वापरत असलेल्या इंटरनेट ब्राऊजरमधून www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर जा.
त्यांनंतर College login या पर्यायामध्ये जाऊन त्याठिकाणी हॉल तिकीट ऑनलाइन डाउनलोड करु शकता.
दरम्यान संबधित ऑनलाइन हॉल तिकीट सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील उच्च माध्यमिक शाळा त्यासोबत कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. हॉल तिकीटात विषय आणि माध्यम बदला संदर्भात दुरुस्त्या असल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने विभागीय मंडळात जाऊन त्या दुरुस्त करून घ्यावयाच्या असल्याची माहितीही शासनाने दिली आहे. हॉल तिकीटावर फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्ती बाबत उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांनी त्यांच्या स्तरावर फक्त त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे. हॉल टिकीट विद्यार्थ्यांकडून हरवल्यास संबंधित शाळा महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने ‘द्वितीय प्रत'( डुप्लिकेट)असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यायचे आहे.
————————————————————————————————–
दहावी परीक्षेचा सविस्तर वेळापत्रक-
15 मार्च : प्रथम भाषा (मराठी, हिंदी उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)
16 मार्च : द्वितीय वा तृतीय भाषा
19 मार्च : इंग्रजी
21 मार्च : हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
22 मार्च : संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
24 मार्च : गणित भाग – 1
26 मार्च : गणित भाग 2
28 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
30 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2
1 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 1
4 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 2
————————————————————————————————–
Categories
Newsletter
Learn With A Difference
PK Jadhav English Classes
Beside Union Bank, Bhagyanagar, Workshop Road,
Nanded, Maharashtra (IN)
+91 94034 58982
+91 88060 27800
Newsletter
Quick Links
Visits
1084298Copyright © 2020 EWPK99 | WPD By findakshay.in