Mr. Vikas Garad.
Deputy Director (Coordinator)
State Council for Educational Research and Training,
Maharashtra, Pune.
संवाद कार्यक्रम
प्रति,
मुख्याध्यापक/प्राचार्य
सर्व माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक विद्यालये,
( राज्य मंडळ संलग्न सर्व)
विषय : मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या समवेत राज्यातील इ. १० वी व इ.१२ वीस अध्यापन करणारे शिक्षक व मुख्याध्यापक यांच्याशी संवाद कार्यक्रमास उपस्थित राहणेबाबत.
मा. ना. प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण या राज्यातील राज्य मंडळाशी संलग्न असणाऱ्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील इ. १० वी व इ.१२ वीस अध्यापन करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापक/ प्राचार्य यांच्याशी गुरूवार, दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी ४.३० वा. संवाद साधणार आहेत.
सदर बैठकीस मा. वंदना कृष्णा, अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण विभाग , मा. विशाल सोळंकी, आयुक्त ( शिक्षण), महाराष्ट्र राज्य व सर्व शिक्षण संचालक, अध्यक्ष, राज्य मंडळ हे उपस्थित राहणार आहेत.
सदर संवाद कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी राज्यातील सर्व संबंधित शिक्षक , मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी
https://jiomeetpro.jio.com/jioconf/attendee/sm-804c7127-6c03-4ecf-98d1-d24d6eed2e82/join/_eM9K-HDd6964512a1afee01644406410944
या लिंकवर जाऊन आपली नाव नोंदणी करावी. सदर नाव नोंदणी लिंक दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी संध्याकाळी ४.१५ वाजता बंद होईल.
प्रत्येक शिक्षक ,मुख्याध्यापक यांना नाव नोंदणी करणे अनिवार्य असेल व प्रत्येकास नोंदणीनंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर व ईमेलवर प्राप्त झालेल्या Unique लिंकवरूनच सदर कार्यक्रमास उपस्थित राहता येईल व त्याद्वारेच उपस्थिती नोंदवली जाईल.
तरी राज्यातील इ. १० वी व इ.१२वीस अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षक तसेच मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी सदर संवाद कार्यक्रमास उपस्थित रहावे.
–
श्री. विकास गरड
उपसंचालक (समन्वय)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र,
पुणे