१. मुलं ज्याची मागणी करतात, ती तात्काळ मान्य करू नका. ती गोष्ट मिळवण्यासाठी काय मेहनत लागते तसेच संयमाची किंमत कळाली पाहिजे.
२. जेव्हा मुलं रागात शिवीगाळ किंवा वाईट शब्द बोलते तेव्हा हसू नका या उलट वाईट आणि चांगले बोलणे या मधला फरक समजून सांगा नाहीतर अशा गोष्टींना तो मनोरंजन समजेल .
३. मुलांच्या वाईट वर्तनाला लगेचच लगाम घालावा कारण काही गोष्टींबद्दल कठोर होणे गरजेचे असते त्याला त्याबद्दल समजावून सांगावे.
४. जेव्हा घरात वस्तु तो इतरत्र टाकेल, तुम्ही उचलण्या ऐवजी त्यास उचलून घ्यायला सांगावे. त्यामुळे त्याला नीट नेटकेपणाची सवय लागेल.
५. मुलांची प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका. जर केली तर तो पुढे जिद्दी होईल. हट्ट केला म्हणून लाड करणे योग्य नाही.
६. जेव्हा मुलं इतरांबद्दल तक्रार करेल, त्या बाबीची शहानिशा करावी नाहीतर आपण चूक सांगितले तरीही पालक ऐकतात, जेव्हा त्याला समजते तेव्हा भविष्यात ती सवय चालू ठेवेल.
७. जेव्हा शाळेत गुण कमी पडतात तेव्हा मुलं अनेक कारण सांगतात परंतु मी अभ्यास न केल्यामुळे गुण कमी पडले असे कधीच सांगत नाही, त्यावेळेस त्याला अभ्यास व त्यासाठीची मेहनत समजावून सांगावी.
८. जगातला कोणताही शिक्षक विद्यार्थ्यांसाठी हिताचे सांगतो. जेव्हा मूल शिक्षकाची तक्रार करते, तेव्हा त्या शिक्षकाला प्रत्यक्ष भेटावे व सत्य परिस्थिति जाणून घ्यावी. जेणेकरून पुढच्या वेळेस तो सत्य सांगेल.
९. शिक्षकांनी कितीही शिकवले तरी अभ्यास तुलाच करावा लागेल ही सत्य बाब त्याच्या मनावर पूर्णपणे बिंबवावी. किमान चौथी वर्गानंतर.
१०. मागीतल्या बरोबर पैसे दिले तर मुलांना त्याची किंमत कळणार नाही व तो समजेल की पैसे मिळविणे सोपे आहे.
११. कधी कधी शिक्षकांनी शिक्षा केली तर वाईट मानू नये नाहीतर भविष्यात त्याला त्याच्या चुकीमुळे पोलिस शिक्षेची वेळ येऊ शकते.
१२. मुलांना समाजामध्ये मिसळायला शिकवावे. त्याला कार्यक्रमाला सोबत घेऊन जावे. जेणेकरून मुलांचा सुसंवाद योग्य व्यक्तीसोबात होईल.
१३. मुले मातीच्या गोळ्यांप्रमाणे घडतात फक्त त्यांना घडवावे लागते. त्यामध्ये पालक व शिक्षक महत्वाची भूमिका बजावतात.
१४. मोबईल सध्या मुलांचा शत्रू आहे. याबाबत पालकांनी जागरूक असणे आवश्यक आहे. सुरुवातीपासूनच त्यांना मोबईल पासून अलिप्त राहण्याची सवय करावी.
१५ . मोबईलमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव भेटत नाहीये.
१६. मुलांमध्ये वाचनाची आवड कशी निर्माण होईल यासाठी प्रयत्न करावेत.
१७. मुलांमध्ये आणि पालकांमध्ये मैत्रीपूर्ण नाते तयार होणे गरजेचे आहे जेणेकरून मूल पालकांपासून कुठलीही गोष्ट लपवून ठेवणार नाही.
१८. सर्वात शेवटी, संतती म्हणजे संपत्ती. या संपत्तीची काळजी घेतलीच पाहिजे. लहान मुलं लहान रोपट्याप्रमाणे असतात. सुरुवातीलाच काळजी घेतल्याने त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होते.
– पी. के. जाधव
Categories
Newsletter
Quick Links
Visits
1163674Copyright © 2020 EWPK99 | WPD By findakshay.in