Written by 12:34 pm Useful Videos

बालभारती : ‘किशोर गोष्टी’ उपक्रम

SSC post

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी १४ नोव्हेंबर १९७१ रोजी ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ’किशोर’ हे मासिक बालभारतीच्या वतीने सुरू करण्यात आले. मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत ही उद्दिष्टे ठेवून किशोर मासिक चालवले जाते. गेल्या ४५ वर्षांत किशोर मासिकाने अनेक पिढ्यांवर वाचनाचे ज्ञान-विज्ञानाचे व मूल्यांचे संस्कार केले आहेत. अनेक चित्रकार, कवी लेखक यांना मासिकाने घडवले आहे.

त्या काळात दहा ते पंधरा वयोगटातल्या मुलांचं मनोरंजन करेल असं मासिक उपलब्ध नव्हतं. मुलांसाठीची महत्त्वाची नियतकालिकं काळाच्या पडद्याआड लुप्त झाली होती. पाठ्यपुस्तकांइतकंच विद्यार्थ्यांना पूरक वाचन साहित्य देणं गरजेचं होतं. पूरक वाचनासाठी पुस्तकं प्रसिद्ध करण्यात अनेक मर्यादा होत्या. मासिकाद्वारे हा उद्देश साध्य करणं शक्य होतं. त्यातून ‘किशोर’ची निर्मिती झाली.

‘किशोर’ मासिकाच्या ५० व्या वर्षातील यशस्वी पदार्पण केल्याने या सुवर्ण महोत्सवानिमित्य बालभारतीने मार्च २०२१ पासून ‘किशोर गोष्टी’ हा एक नवा उपक्रम सुरु केला आहे. ई-बालभारतीच्या अत्याधुनिक स्टुडीओ मधून प्रत्येक शनिवारी सकाळी ११.०० वाजता काही नामवंत बालसाहित्यिक गोष्ट सांगत असतात. बालगोपाळांनी निश्चितच या बालभारतीच्या सुंदर उपक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन बालभारतीच्या वतीने करण्यात आले आहे.

सौजन्य : बालभारती

गोष्ट पहिली

गोष्ट दुसरी

गोष्ट तिसरी

गोष्ट चौथी

गोष्ट पाचवी

गोष्ट सहावी

गोष्ट सातवी

गोष्ट आठवी

गोष्ट नववी

गोष्ट दहावी

गोष्ट अकरावी

(Visited 512 times, 1 visits today)
Close