Written by 12:21 am Uncategorized

The secret of Japanese People Rich Health – Marathi Article

 
  
 
जपानचे लोक एवढे दीर्घायुष्य का असतात   ? असे म्हणतात की जपानमध्ये सरासरी आयुष्यमान हे 80 ते 82 वर्षे आहे ,बाकी देशाच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक मानले जाते ,जपानी लोक एवढे आयुष्य कसे जगतात किंवा एवढ्या आयुष्य त्यांना कशी मिळते याची कारणे शोधूया.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे जपानचे लोक हे चालण्यावर जास्त विश्वास ठेवतात , खरे पाहता जपान मध्ये सगळ्या गोष्टी कॉम्प्युटर depended आहेत, जपानी लोकांना सगळ्या सुख सुविधा आहेत ,तरीसुद्धा एवढे आराम असतानाही हे लोक चांगले आयुष्य कसे मिळवतात . त्यातली सर्वात प्रथम प्रमुख कारण म्हणजे  त्यांची स्वच्छता , जपानी लोकांना स्वच्छता फार आवडते , स्वच्छतेमुळे त्यांच्या आयुष्य वाढते ,स्वतःचे घर रस्ते सार्वजनिक जागा सर्व काही स्वच्छ असते. अशा वातावरणामुळे त्यांचे आयुष्य किंवा आरोग्य  maintain होते ,दुसरे कारण म्हणजे जपानमध्ये अनेक प्रकारचे चहा असते परंतु चहा बनवण्याची पद्धत हे  नसते . हे लोक सहसा ग्रीन टी पसंत करतात त्यांच्याकडे ग्रीन टी चे अनेक प्रकार आहेत, ग्रीन टी हे आरोग्याला अतिशय लाभदायक असते कारण त्यात  antioxidant प्रमाण चांगले असते .आपण जे चहा बनवतो त्याचे मिश्रण आरोग्यास अपायकारक समजले जाते ,परंतु जपानचे लोक फक्त ग्रीन टी पसंत करतात ही त्यांच्या चांगल्या health एक प्रमुख कारण आहे .दुसरे म्हणजे जपानी लोक आहारासाठी जे प्लेट वापरतात त्याचा आकार लहान असतो, साहजिकच अन्नाची मात्र प्रमाणात घेतली जाते. याशिवाय जपानच्या लोकांचे मुख्य खाद्य हे समुद्री अन्न व इतर पालेभाज्या असतात ,साहजिकच यांना मध्ये जास्त कार्बोहायड्रेट्स किंवा फॅटचे प्रमाण कमी असते .प्रोटीन भरपूर असल्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते अर्थातच त्याचा परिणाम म्हणजे त्यांची पचनक्षमता ही चांगल्या प्रमाणात असते .
जपानी लोक आपल्या आहारात प्रामुख्याने मासे किंवा हिरव्या पालेभाजी वापरतात ,यामुळे त्यांना भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक मिळतात .परिणामी त्यांच्या आहारात अशा आरोग्यदायी घटकामुळे ते कोलेस्ट्रॉल किंवा फॅट पासून दूर राहतात ,असे म्हणतात की 80 टक्के बिमारी हे लठ्ठपणा मुळे होत असतात पण जपानी लोक हे सहसा लठ्ठ नसतात ,त्यांच्या आहारामध्ये मैदा किंवा गोड पदार्थ हे दिसत नाहीत, या सर्वांचा परिणाम म्हणजे त्यांची मानसिक व शारीरिक आरोग्य निरोगी असते
जपानमध्ये चपाती किंवा इतर कर्बोदके मिश्रित अन्न नसतात 
तळलेले पदार्थ सहसा ते टाळतात ,त्याऐवजी ते भात खाणे पसंत करतात पण त्यांचा भात हा आपल्यापेक्षा वेगळा असतो व पौष्टिक असतो .त्यांच्याकडे सहसा ब्राऊन राईसचा वापर केला जातो .जपानचे लोक हे समुद्रातील मासे किंवा वनस्पती याचा वापर जास्त करतात ज्यामध्ये जास्त प्रमाणात प्रथिने आढळतात याचा सर्वाधिक फायदा त्यांना त्यांचे शरीर निरोगी ठेवण्यास होत असते
(Visited 267 times, 1 visits today)
Close