Written by 7:27 am चला इंग्रजी शिकूया (मराठीतून)

प्रेरणादायक कथा – काही समस्या उलगडणाऱ्या असतात पण आपणच त्यांना क्लिष्ट करतो

काही समस्या उलगडणाऱ्या असतात पण आपणच त्यांना क्लिष्ट करतो

एकदा एक राजा होता. जो आपल्या प्रजेची खूप काळजी घेई. तो अतिशय दानशूर होता, न्यायप्रिय होता. पण बिचारा निपुत्रिक होता. याचे त्याला फार वाईट वाटे. याच चिंतेत तो खूप उदास राहायचा. आता तो खूप वृद्ध झालेला होता. त्याला वाटले कि आता आपला वारस शोधायला हवा आणि म्हणून त्याने दवंडी पिटवली आणि सांगितले कि, जो कुणी राजा होण्याचा लायकीचा / शर्यतीतला असेल त्याने राजमहालात यावे.

पाहतो तर काय ! राजमहाल जवळ – जवळ संपूर्ण गर्दीने भरून गेला. आता यात निवड कशी करावी, हा यक्ष प्रश्न होता. तेव्हा त्याने एक युक्ती काढली. त्यामध्ये त्याने एका दरवाज्यावर असे लिहिले कि, जो कि यामधले कोडे सोडवेल, तो पुढचा राजा असेन. प्रत्येक जण दरवाज्याजवळ यायचा, कोडे वाचायचा, परत फिरायचा, असे करत – करत सर्वजण परत फिरले. राजा खूप उदास झाला. तेवढ्यात एक तरुण समोर आला. त्याने कोडे न वाचताच दार उघडले आणि काय तर तेथे असे वेगळे काहीच नव्हते. आणि त्याला राजा घोषित केले गेले.

तात्पर्य : कधी – कधी आयुष्यात समस्या येतात. त्या अगदी सोडवण्यासारख्या असतात, पण अति विचाराने आपणच त्यांना क्लिष्ट करतो.
(Visited 349 times, 1 visits today)
Close