1.२६ जुलै ते २ ऑगष्ट दरम्यान सीईटीसाठी अर्ज करता येणार आहे. लिंक २६ जुलै रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता कार्यान्वित होईल.
2.सीईटी पोर्टलची लिंक वेबसाइटवर देण्यात येईल.
3.विद्यार्थ्यांनी बैठक क्रमांक टाकणे अनिवार्य आहे.
4.त्यानंतर विद्यार्थ्यांना सीईटी द्यायची आहे की नाही, असे दोन पर्याय विचारले जातील.
5.विद्यार्थ्यांनी होय पर्याय जर निवडला तर त्यांना नोंदणी व पुढील कार्यवाही करायची आहे.
6.परीक्षा दिनांक- 21 August 2021 (वेळ- स.११.०० ते १.००)
7.परीक्षा ही ऑफलाइन पद्धतीने होईल.
8.परीक्षा केंद्रे लवकरच जाहीर करण्यात येतील.
9.सीईटी परीक्षा दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
10.गणित, विज्ञान, इंग्रजी आणि समाजशास्त्र या चार विषयांमधील एकूण १०० प्रश्न परीक्षेला विचारले जातील.
11.१०० गुणांच्या या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत.
12.परीक्षा ही ओ.एम.आर. (Optical Mark Recognition) शिटवर घेण्यात येईल.
13.परीक्षेसाठी दोन तासांचा वेळ असेल.
14.यासाठी मंडळाकडून स्वतंत्र अभ्यासक्रम निर्गमित केला जाणार आहे.
15.निश्चितच हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पेलवणारा व सोप्या पद्धतीने मांडलेला असेल.
16.सीईटी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येईल.
17.सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर रिक्त जागी सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.
18.हा प्रवेश त्यांच्या इयत्ता १० वीच्या गुणांच्या आधारे दिला जाईल.