Written by 5:52 pm Competitive Exam English

Inspiring and Motivational Thoughts in Marathi

When thoughts are changed, life will be changed, some beautiful as well as inspiring, motivational thoughts in Marathi for students

Photo_1608985670454

प्रेरणादायी सुविचार

विद्यार्थ्यांनो,
👉 आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर, सतत मेहनत करत पुढे जावे लागते.
👉 कष्टाच्या सागराला यशाचा किनारा असतो.
👉 आळस हा स्विकारायला गोड असतो. त्याचे फळ मात्र कडू असते.
👉 परिश्रमाने शरीर निरोगी राहते व मन निर्मळ बनते.
👉 जीवनाचे नंदनवन करण्याचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे परिश्रम.
👉 अर्धा तास रिकामे बसण्यापेक्षा कोणतेही काम केलेले अधिक बरे.
👉 ज्याची कृती सुंदर, त्याची मूर्ती सुंदर.
👉 आवड असली कि, कोणत्याही कामाला सवड मिळते.
👉 क्रोध हि दुर्बलतेची निशाणी आहे.
👉 क्रोधाच्या सिंहासनावर बसताच, बुद्धी तेथून निघून जाते.
👉 क्रोध, उत्पन्न करणाऱ्या कारणांपेक्षा त्याचा परिणाम अत्यंत दु:खमय असतो.
👉 आजच्या सूर्याला उद्या येणाऱ्या ढगाआड लपवणे याचेच नाव चिंता आहे.
👉 अभ्यासात सतत मग्न असणारा विद्यार्थी हा नेहमी आनंदी आसतो.
👉 जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची कसोटी आहे.
👉 आराम हा जीवनाचा गंज आहे. त्याने सर्व शक्तींचा ऱ्हास होतो.
👉 जीवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलात नाही.
👉 विवेक हा मनुष्याचा सर्वात मोठा मित्र आहे.
👉 जुने कपडे वापरा, पण नवी पुस्तके खरेदी करा.
👉 मनुष्य हाच आपल्या भाग्याचा कारागीर आसतो.
👉 जो मनाला जिंकतो, तो जगालाही जिंकु शकतो.
👉 जेव्हा मन प्रसन्न असते तेव्हा बुद्धी स्थिर होते.
👉 मन निश्चयी असेल तर आपण कोणतेही यश प्राप्त करू शकतो.
👉 तुम्ही चांगले मित्र निवडा, तुमचे तुमचे चांगले मित्र तुम्हाला घडवतील.
👉 वाईट संगतीत राहण्यापेक्षा एकटे राहणे केव्हाही चांगले.
👉 ध्येय जितके महान, तेवढा त्याचा मार्गही लांब व खडतर असतो.
👉 तुमचे विचार बदला, आयुष्य बदलेल.
👉 पुस्तके हेच विद्यार्थ्यांचे खरे मित्र असतात.
👉 तुमच्या बोलण्यावरून तुमचा स्वभाव समजतो. त्यामुळे बोलण्यात नेहमी नम्रता व विनयता असावी.
👉 जो वाईट मनावर विजय प्राप्त करेल, तो जगातील सर्व अशक्य गोष्टींवर विजय प्राप्त करेल.
IMG-20201226-WA0026
(Visited 554 times, 1 visits today)
Close